Saving Account


     सेविंग अकाउंट ला मराठी मध्ये बचत खाते असे म्हणतात, हे खाते सर्व साधारण लोकांसाठी असते. बचत खाते हे व्यक्तींसाठी असते. आपल्या केलेल्या कामातून बचत करण्यासाठी, पगारदार व्यक्तींसाठी आपला पगार खात्यावर जमा करण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी तसेच गॅस ची सबसिडी जमा करण्यासाठी, इतर शासकीय निधी मिळण्यासाठी आणि इतर कामासाठी बचत खात्यासाठी आवश्यकता असते.

     आपल्या कामातून कमावलेल्या पैशातून जो पैसा वाचतो त्या पैशाला सर्व साधारण लोक आपल्या बचत खात्यात जमा करतात. अशा प्रकारच्या खात्यामध्ये ATM कार्ड आणि चेक बुक, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग ची सुविधा असते या खात्यावर आपल्याला व्याज सुध्दा मिळते.