Founder Message
मा. जे. के. (बापू) जाधव
संस्थापक
     मानसिंग को-ऑप. बँक लि., दुधोंडी या संस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधरण सभेसाठी उपस्थित सर्व सभासद मान्यवर, बँकेचे संचालक मंडळ आणि उपस्थित बंधू-भगिनी, बँकेचा सर्व स्टाफ आपणा सर्वांचे स्वागत करताना मन भरून येते, एक प्रकारचे समाधन वाटते, आनंद वाटतो.
     २५ वर्षापूर्वी आमचे श्रद्धास्थान, शक्तिस्थान, स्फूर्तीस्थान आणि प्रेरणास्थान असणाऱ्या आदरणीय जे. के. बापूंनी सहकाराच्या प्रांगणात मुठी एवढ्या गावात सहकाराचे एक रोपटे लावले.
     खेड्यात लावलेल्या दुधोंडी सारख्या गावात ही मानसिंग बँक तग धरणार? टिकणार? का बंद पडणार ? अशी चर्चा त्या काळात चालू होती, तर काहींनी हा विषय एक थट्टाच केली होती. पण शेतीतल्या, मातीतल्या शेतकऱ्याच्या कुळीतला, कष्ट आणि श्रमाच्या घामात चिंब भिजलेला हा माणूस प्रचंड विश्वासानं सहकाराच्या पंढरीची वारी चालत राहिला. शेती, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांची शिदोरी पाहिली होती. अनुभवली होती....
     शेती करताना बैलाचे पैर यात सहकार पाहिला होता, औत करताना, पेरणी मळणी करताना सहकाराच एक रोप अनुभवल होतं. आणि तोच सहकाराविना नाही, समृद्धी हे तस जगत मानसिंग बँकेच रोपट या भूमित लावल होतं. समाजातील आर्थिक क्षेत्रातील दुर्बलता, सावकारी कर्जाचे फासाचे दोर, आर्थिक दृष्ट्या कमकुवत, दुबळेपणा अशा अविकसीत जनसमूहाच्या आर्थिक विकास, प्रगती पतहिनांना पतवान रोजघडीच्या आर्थिक समस्या सोडविणयासाठी उद्याच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी या रोपट्याची लागण केली होती. आज हे रोपटं आदर्श सहकारी बँकेचा एक वटवृक्ष झाला आहे. या वृक्षाच्या पाच फांद्या अनेकांना आर्थिक आधार, प्रगतीच्या उन्नतीच्या विकासाच्या सावल्या देत आहेत. अनेक घरकुलांना समृद्ध केले आहे. अशा या सहकार वृक्षाचे आजचे हे २६ वे वर्ष आहे. बापू तुम्ही श्रमाने पाणी घालून श्रद्धेचे संरक्षण देऊन, जन कल्याणाचा संदेश देवून, विश्वासाची फळं आम्हां सर्वांना भरवायला दिलीत, जीवनाच्या सुख वाटा दाखविलात, विश्वासाचं वातावरण निर्माण केलत. सहकार श्रद्धेनं जोपासत, फळप्राप्ती पर्यंतचा तुमचा हा प्रवास आम्हां सर्वांना आधार देणारा आहे.