Daily Saving


     अर्थशास्त्रानुसार पैसे कमवणं सोपं असलं तरी ते खर्च करणं कठीण असतं याचा अर्थ नोकरी, रोजंदारी किंवा इतर कोणत्याही मार्गाने कष्ट करून तुम्ही पैसे कमवू शकता, पण त्या पैशाचा वापर करण्याचे म्हणजेच योग्य कामात खर्च करण्याचे ज्ञान लोकांना नाही. बहुतांश लोक आपल्या कष्टातून कमावलेले पैसे व्यर्थ कामांमध्ये खर्च करतात.

     मात्र, पैसा वाचविणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे वास्तव आहे. खरं तर लोक दर महिन्याला जी अल्पबचती करतात, ती आपल्या भविष्यासाठी आधार ठरतात. बचत करण्यासाठी लोक आपल्या उत्पन्नानुसार वेगवेगळ्या प्रकारे बचत करतात, बहुतेक लोक बचतीसाठी आरडी खाते उघडतात, ज्यामध्ये ते दरमहा मुदत ठेव तयार करतात.

     आपल्या बँकेतील सर्व ठेवींना विमा संरक्षण असून DGCI या विमा कंपनीकडून ५,००,००० (पाच लाख) पर्यंतचा विमा मिळतो.

     सर्व प्रकारच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% ज्यादा व्याजदर मिळते.