ATM/UPI Facility
      यु.पी.आय (युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस) द्वारे तुम्ही कोणत्याही बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करु शकता. याचा अर्थ तुम्ही खरेदी करु शकता, बिले भरू शकता किंवा कोणत्याही व्यक्ती, व्यापारी, शोपिंग मॉल मध्ये पैसे पाठवू किंवा प्राप्त करु शकता. पेमेंटसाठी क्यू आर कोड स्कॅन करू शकता. फोन पे गुगल पे, पेटिएम, ॲमेझॉन पे असे अनेक अँप आहेत. ज्याच्या मदतीने यु.पी. आय वापरता येते. तुम्हाला यापैकी कोणतेही अॅप तुमच्या बँकेशी लिंक करावे लागेल आणि तुमचे ए.टी.एम. तपशील दिल्या नंतरच तुम्ही तुमचे यु. पी. आय खाते वापरु शकता. हे एक असे अॅप्लिकेशन आहे. जे तुम्हाला मोबाईल द्वारे दोन बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास मदत करते. यु.पी.आय हे एक प्रकारचे नविन डिजीटल तंत्रज्ञान आदि जे सध्याच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आहेत.