Health Care


प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
     भारत सरकारचे केंद्रीय वित्तीय मंत्रालयामार्फत जाहीर केलेल्या वित्तीय समावेशामध्ये अंतर्भुत केलेल्या सदर योजनेमध्ये बचत खातेदारास प्रती मानसी वार्षिक पॉलिसी ४३६ भरून पॉलिसी घेता येईल, पॉलिसीधारकाचे कुठल्याही कारणास्तव दुर्देवाने निधन झाल्यास पॉलिसी धारकाच्या कायदेशीर वारसास स्वकम रु. २,००,०००दिमा रक्कम पात्र होईल. सदर पॉलिसीची कार्यवाही करणेसाठी आपण लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. यांचेबरोबर करार केलेला आहे. सदर विमा योजनेसाठी वयाची अट ही १८ ते ५० वर्षापर्यंत आहे.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
     भारत सरकारचे केंद्रीय वित्तीय मंत्रालयामार्फत जाहीर केलेल्या वित्तीय समावेशामध्ये अंतर्भुत केलेल्या सदर योजनेमध्ये बँकेच्या बचत खातेदारास प्रती मानसी वार्षिक पॉलिसी रकम रु. २० भरून पॉलिसी घेता येईल. पॉलिसी धारकांचे अपघाती निधन झाल्यास, पॉलिसी धारकाच्या कायदेशीर वारसास रक्कम रु. २,००,००० विमा रक्कम प्राप्त होईल. तसेच या विमा योजनांसाठी वयाची अट ही १८ ते ७० वर्षापर्यंत आहे. वरील दोन्हीही विमा योजना फक्त बचतठेव खातेदारासाठी असून, बँकच्या सर्व शाखामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे.