Current Account


     करंट खात्याला चालू खाते असेही म्हणतात. हे असे खाते आहे ज्यात तुम्ही रोजचे व्यवहार नेहमी करू शकता. हे खाते कोणत्याही कंपनी, सार्वजनिक उपक्रम, व्यावसायिकांसाठी वापरले जाते. जिथे मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार होतात, असे लोक चालू खात्याचा वापर करतात.

     तुम्ही चालू खात्यात एका दिवसात पाहिजे तेवढे पैसे व्यवहार करू शकता. यात कोणतीही मर्यादा नाही आणि म्हणूनच आरबीआयने असा नियम केला आहे की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चालू खात्यात व्याज मिळत नाही. तुम्ही खात्यात कितीही पैसे जमा केले तरी तुम्हाला व्याज मिळणार नाही. सोप्या भाषेत, चालू खाते व्यवसायाशी संबंधित आहे, ते व्यवसाय करणारे लोक वापरतात आणि त्यातून कोणत्याही वेळी कोणतेही व्यवहार करता येतात.

     सामान्य नागरिक करंट अकाउंट उघडत नाही, व्यावसायिक, स्टार्टअप्स किंवा अशे लोक ज्यांना रोजची किंवा नेहमी transaction करायचे असतात, तेच लोक करंट अकाउंट उघडत असतात.