Fixed Deposit


     ज्यांना पैशांबाबत कोणताही धोका पत्करायचा नाही अशा गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवी हे एक उत्कृष्ट गुंतवणुकीचे साधन आहे. कोणत्याही बँक अथवा बँकेतर वित्तीय कंपनी (एनबीएफसी) इच्छुक गुंतवणूकदारांसाठी मुदत ठेवीचे खाते उघडण्याची सुविधा देते. तथापि काही कंपन्यांकडून देखील गुंतवणूकदारांकडून मुदत ठेवी स्वीकारल्या जातात. संपत्तीत वाढीपेक्षा स्थिर, सुरक्षित आणि निश्चित परताव्याच्या शोधात असणाऱ्या गुंतवणूकदारांनी मुदत ठेवी खात्यांमध्ये पैसा घालणे आदर्श ठरेल.

     तुम्ही जेव्हा मुदत ठेवीत गुंतवणूक करता, तेव्हा तो पैसा बँकेकडून तिचा कर्ज व्यवसाय चालविण्यासाठी वापरला जातो. म्हणजे एका परीने तुम्ही बँकेलाच तुमचा पैसा ठरावीक मुदतीसाठी वापरायला देत असता, बँक त्या बदल्यात तुम्हाला व्याज रूपाने परतावा देते. शिवाय ठेवी करीत असताना जे व्याज बँकेकडून ठरविला जातो, तोच संपूर्ण मुदतीच्या काळात, बाजारात कितीही उलथापालथ झाली आणि व्याजदर वर-खाली झाले तरी स्थिर व अपरिवर्तनीय राहतो.

     आपल्या बँकेतील सर्व ठेवींना विमा संरक्षण असून DGCI या विमा कंपनीकडून ५,००,००० (पाच लाख) पर्यंतचा विमा मिळतो.

     सर्व प्रकारच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना ०.५०% ज्यादा व्याजदर मिळते.